साकळी येथे कत्तलीच्या उद्देशातून गोवंशची वाहतूक : दोघांविरुद्ध गुन्हा


यावल : यावल तालुक्यातील साकळी गावात छोटा हत्ती वाहनामध्ये कत्तलीच्या उद्देशातून गोवंश वाहतूक केली जात असल्याची माहिती यावल पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी कारवाई करीत गोवंश आणि वाहन ताब्यात घेतले. दोन जणांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात प्राणी अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

गोपनीय माहितीवरून कारवाई
साकळी, ता.यावल गावात कत्तलीच्या उद्देशातून छोटा हत्ती वाहन (क्रमांक एम. एच. 19 एस. 8015) मध्ये गोवंश वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांना मिळताच त्यांनी पथक त्या ठिकाणी पाठवले. पथकाने गोवंश आणि वाहन ताब्यात घेतले. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात हवालदार उमेश महाजन यांच्या फिर्यादीवरून नासिर शेख व जहांगीर खान (दोन्ही रा.साकळी) यांच्याविरुद्ध प्राणी अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार उमेश सानप करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !