वीज खांबावरील आकोडे काढल्याच्या वीज कंपनीच्या तिघा कर्मचार्यांना मारहाण : भुसावळ तालुक्यातील निंभोर्यातील घटना
Three employees of the electricity company were beaten up for removing the code from the electricity pole : incident in Nimbhora in Bhusawal taluka. भुसावळ : वीज तारांवर टाकलेले आकोडे काढल्याच्या रागातून भुसावळ तालुक्यातील निंभोरा बु.॥ येथे वीज कंपनीच्या महिला कर्मचार्यासह तिघांना मारहाण करण्यात आली. ही घटना मंगळवारी सकाळी 11.30 वाजता घडली. याप्रकरणी चौघांविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, मारहाणीच्या घटनेचे वीज कंपनीतील कर्मचार्यांनी निषेध करीत दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.
आकोडे काढल्याच्या रागातून मारहाण
वीज कंपनीचे वरीष्ठ तंत्रज्ञ समाधान भास्कर बुगले (34, खडका, ता.भुसावळ) यांच्या तक्रारीनुसार, मंगळवारी सकाळी 11.30 वाजता निंभोरा गावातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी गेल्यानंतर वीज तारांवर आकोडे टाकण्यात आल्याचे दिसल्यानंतर हे आकोडे काढल्याच्या रागातून संशयीत गणेश उर्फ गोल्या माधव सोनवणे व देवा (पूर्ण नाव माहित नाही) यांनी आपल्यासह सचिन काकडे यांना मारहाण केली तसेच गर्दीतील दोन अनोळखी महिलांनी वीज तारांवरील काढलेल्या सर्विस वायरने महिला कर्मचारी आशा सुनील भटकर यांना मारहाण केली.

मारहाणीच्या प्रकारानंतर कर्मचार्यांनी ही घटना सहा.अभियंता विकास कोळंबे, उपकार्यकारी अभियंता प्रशांत इंगळे यांना कळवली. याप्रकरणी गोल्या माधव सोनवणे, देवा व अन्य दोन अनोळखी महिलांविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक बबन जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
