कंडारी येथील तरुणाला लोखंडी पाईपाने मारहाण


भुसावळ : उसनवारीच्या पैशाच्या वादातून कंडारी येथील तरुणाला शिविगाळ करून लोखंडी पाईपाने मारहाण करण्यात आली. ही घटना बुधवार, 19 रोजी रात्री 11.30 वाजता घडली.

स्वप्नील देविदास सूर्यवंशी (32, गौतम हौसिंग सोसायटी, कंडारी) यांच्या तक्रारीनुसार, संशयीत रोहित अनिल सोनवणे (28, गौतम हौसिंग सोसायटी, कंडारी) याने उसने घेतलेले चारशे रुपये आताच्या आता पाहिजे या कारणावरून घरात येत शिविगाळ करून लोखंडी पाईपाने मारहाण केली. तपास हवालदार सुपडा पाटील करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !