निंभोर्‍यात किरकोळ वादातून कंत्राटदारास मारहाण


भुसावळ : भुसावळ तालुक्यातील निंभोरा बु.॥ येथे किरकोळ वादातून कंत्राटदारास शिविगाळ करीत फायटरने मारहाण करण्यात आली. ही घटना बुधवार, 19 रोजी सकाळी 11.30 वाजता घडली. याप्रकरणी दोघांविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

दुर्गेश रामदास कोलते (36, निंभोरा) हे कंत्राटदार आहेत. संशयीत विशालने किरकोळ वादातून नाकावर मारून दुखापत केली तसेच गोकुळने डोक्यावर बुक्क्यांनी मारून दुखापत केली. याप्रकरणी विशाल सतीश महाजन व गोकुळ काशीनाथ लोहार (फेकरी, ता.भुसावळ) यांच्याविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक बबन जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार प्रेमचंद सपकाळे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !