भुसावळात पाणी फेकण्याच्या वादातून वयोवृद्धाला मारहाण


भुसावळ : घराबाहेर पाणी फेकण्याच्या वादातून 60 वर्षीय वयोवृद्धाला मारहाण करण्यात आली. ही घटना खडका रोडवरील जाम मोहल्ला मशिदीजवळ शुक्रवार, 21 रात्री 11 वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी एकाविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

शहनबाज खान रशीद खान (60, खडका रोड, भुसावळ) यांच्या तक्रारीनुसार, संशयीत शेख जुनेद शेख शकील (खडका रोड, भुसावळ) यांनी पाणी फेकण्याच्या वादातून लोखंडी वस्तूने डोक्यावर मारहाण केली तसेच कुटूंबियांना ठार मारण्याची धमकी दिली. तपास नाईक सोपान पंडित करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !