रेल्वेचा पुन्हा ब्लॉक : आठ गाड्या रद्द, सहा गाड्यांचे मार्ग बदलले

बिलासपूर विभागातील कोतरालियात होणार नॉन इंटरलॉकिंगचे कार्य


भुसावळ :  बिलासपूर विभागातील कोतारालिया येथे एनटीपीसी तलाईपल्ली माईन्स लाईन कनेक्टिव्हिटीच्या संदर्भात नॉन इंटरलॉकिंग कामासाठी ब्लॉक घेण्यात येत असून आठ रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर सहा गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. ऐनवेळी जाहीर करण्यात आलेल्या ब्लॉकमुळे रेल्वे प्रवाशांची अतोनात गैरसोय होणार आहे.

आठ रेल्वे गाड्या रद्द
ट्रेन क्रमांक 20822 सांत्रागाची-पुणे एक्सप्रेस 29 जून रोजी रद्द, ट्रेन क्रमांक 20821 पुणे-सांत्रागाछी एक्सप्रेस 1 जुलै रोजी रद्द, ट्रेन क्रमांक 12880 भुवनेश्वर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस 24 व 27 रोजी रद्द, ट्रेन क्रमांक 12879 लोकमान्य टिळक टर्मिनस-भुवनेश्वर एक्सप्रेस 26 व 29 रोजी रद्द, ट्रेन क्रमांक 12130 हावडा-पुणे आझादहिंद एक्सप्रेस 27 जून व 2 जुलै रोजी रद्द, ट्रेन क्रमांक 12129 पुणे-हावडा आझादहिंद एक्सप्रेस 27 जून व 2 जुलै रोजी रद्द तर ट्रेन क्रमांक 12101 लोकमान्य टिळक टर्मिनस- शालिमार एक्सप्रेस 24 व 29 जून रोजी रद्द तसेच ट्रेन क्रमांक 12102 शालिमार-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस 26 जून व 1 जुलै रोजी रद्द करण्यात आली आहे.
26.06.2024 आणि 01.07.2024 रोजी रद्द.

सहा गाड्यांच्या मार्गात बदल
ट्रेन क्रमांक 12860 हावडा-मुंबई गीतांजली एक्सप्रेस 24 ते 29 जूनदरम्यान
झारसुगुडा, टिटलागड, रायपूरमार्गे तर ट्रेन क्रमांक 12859 मुंबई-हावडा गीतांजली एक्स्प्रेस 26 जून ते 1 जुलैदरम्यान रायपूर, टिटलागड, झारसुगुडा मार्गे वळवण्यात येणार आहे. ट्रेन क्रमांक 22846 हटिया-पुणे एक्सप्रेस 28 जून रोजी झारसुगुडा, टिटलागड, रायपूर मार्गे वळवली जाईल तसेच ट्रेन क्रमांक 22845 पुणे-हटिया एक्स्प्रेस 26 जून व 30 जून रोजी रायपूर, टिटलागड, झारसुगुडा मार्गे वळवली जाईल तसेच ट्रेन क्रमांक 12905 पोरबंदर-शालिमार एक्स्प्रेस 26 जून व 27 रोजी रोजी रायपूर, टिटलागड, झारसुगुडा मार्गे तसेच ट्रेन क्रमांक 12906 शालिमार-पोरबंदर एक्स्प्रेस 28 व 29 रोजी झारसुगुडा, टिटलागड, रायपूर मार्गे वळवण्यात येणार आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !