साकळी येथे अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले
यावल : यावल तालुक्यातील साकळी गावात अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर महसुलच्या पथकाने पकडले. ही कारवाई रविवारी सायंकाळी करण्यात आली. ट्रॅक्टरमध्ये अर्धा ब्रास वाळू होती. संबंधीत ट्रॅक्टर मालकास सोमवारी दंडाची नोटीस बजावण्यात आली. या कारवाईने अवैध गौण खनिज वाहतूक करणार्यांमध्ये खळबळ उडाली.
अवैध वाळू वाहतूकदारांमध्ये खळबळ
साकळी गावात एका विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरमध्ये वाळू वाहतूक केली जात असल्याची माहिती तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांना मिळाली होती. त्यांनी महसूलच्या पथकास कारवाईच्या सुचना केल्या. फैजपूर मंडळाधिकारी एम.एच.तडवी, सावखेडासीम मंडळाधिकारी ए.वाय.बडगुजर, यावल तलाठी ईश्वर कोळी, तलाठी वसीम तडवी, तलाठी मिलिंद कुरकुरे, तलाठी यू.यू.बाभुळकर या पथकाने साकळी गावात जावुन विना क्रमांकाचे ट्रॅक्टर पकडले व त्यात असलेल्या अर्धा ब्रास वाळुचा पंचनामा करून ट्रक्टर तहसील कार्यालयात जमा केले. याप्रकरणी ट्रॅक्टर मालक सायराबी सय्यद मोहम्मद (रा.साकळी) यांना सोमवारी दंडाची नोटीस बजावण्यात आली. महसुल विभागाकडून करण्यात आलेल्या या कारवाईमुळे अवैध गौण खनिज वाहतुक करणार्यामध्ये खळबळ उडाली.

