केर्‍हाळेत किरकोळ कारणावरून एकावर विळ्याने प्राणघातक हल्ला


रावेर  : किरकोळ कारणावरून मजुरांच्या वादात एकाने विळ्याने वार करून एका युवकास गंभीर जखमी केले. ही घटना रविवारी रावेर तालुक्यातील केर्‍हाळा येथे घडली. याबाबत रावेर पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

सात संशयीतांविरोधात गुन्हा
रविवारी सायंकाळी 5.30 वाजता केर्‍हाळे येथील प्रिंपी रस्त्यावरील जय भोले तोल काट्यावर केळीने भरलेल्या वाहनाचा वजन काट्यावर आधी वजन करण्याच्या कारणावरून विकी यशवंत वाघ (आहिरवाडी) व रियाज रफिक तडवी यांच्यात वाद झाला . हा वाद वाढत जाऊन विकी याने रियाज (18) यास मानेवर विळ्याने मारून प्राणघातक हल्ल करण्यात आला तसेच गणेश देविदास वाघ, विशाल खुशाल गोमटे, नितीन गोमटे, करण तायडे, सिद्धार्थ भालेराव, मंगल पाटील यांनी फिर्यादी सब्दर तडवी व रियाज यास चापटा बुक्यांनी मारहाण केली. याबाबत सबदर हैदर तडवी (भोकरी) यांनी रावेर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सात जणांविरुद्ध प्राणघातक हल्ला व दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपनिरिक्षक तुषार पाटील करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !