उचंद्यात गळ्याला चाकू लावत पानटपरी चालकाकडील 11 हजार रुपये लूटले
मुक्ताईनगर : अंगणात झोपलेले अपंग पानटपरी चालकाच्या गळ्याला चाकू लावत भामट्याने 11 हजारांची रोकड लूटली. ही घटना तालुक्यातील उचंदा येथे शुक्रवार, 21 जून रोजी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी शुभम सुनील इंगळे (उचंदा) याच्याविरोधात मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
असे आहे लूट प्रकरण
संदीप समाधान इंगळे (30, उचंदा) हे व्यवसायाने पानटपरी चालक असून दिव्यांग आहेत. घराबाहेर ते झोपले असताना शुक्रवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास शुभम सुनील इंगळे याने गळ्याला चाकू लावत पँटच्या खिशातील पानटपरीवरील व्यवसायाचा दिवसभराचा गल्ला तसेच नागरिकांकडून भिशीची रक्कम मिळून 10 हजार 900 रुपये लुटून पोबारा केला. तपास पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप चेडे करीत आहेत.

