गावठी पिस्टलांसह दोघे वरणगाव पोलिसांच्या जाळ्यात

दोन जिवंत काडतूस व दोन पिस्टल जप्त : वरणगाव पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक


भुसावळ  : वरणगाव पोलिसांनी गावठी पिस्टलांची विक्री करताना खरेदीदारासह विक्रेत्याला अटक केली. सागर प्रकाश डिके उर्फ सत्या (24, रा.टहाकळी, ता.भुसावळ) व आकाश विष्णू सपकाळे (23, रायपूर, ता.रावेर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. ही कारवाई टहाकळी फाट्याजवळ रविवार, 23 रोजी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास करण्यात आली. संशयीतांकडून दोन गावठी पिस्टल, दोन जिवंत काडतूस असा एकूण 34 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सोमवारी संशयीतांना न्यायलायात हजर केले असता एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

गोपनीय माहितीवरून कारवाई
भुसावळ तालुक्यातील टहाकळी फाट्यावर संशयीत गावठी पिस्टल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती वरणगावचे सहाय्यक निरीक्षक भरत चौधरी यांना मिळाली होती. त्यांनी पथकाला सूचना केल्यानंतर रविवार, 23 जून रोजी रात्री 11.30 वाजता सापळा रचून संशयीत सागर प्रकाश डिके उर्फ सत्या (24, रा.टहाकळी, ता.भुसावळ) व आकाश विष्णू सपकाळे (23, रायपूर, ता.रावेर) यांना ताब्यात घेतले.

दोघांच्या अंग झडतीत काडतूस व दोन गावठभ पिस्टल आढळल्याने ते जप्त करण्यात आले. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल योगेश सुभाष पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरोधात वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र जैन करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !