भुसावळ शहरातील कुलहोम्स अपार्टमेंटमध्ये घरफोडी
Burglary at Kulhomes Apartment in Bhusawal भुसावळ : शहरात गेल्या काही दिवसांपासून चोर्या-घरफोड्यांचे सत्र कायम आहे. बंद घरांनाच चोरट्यांकडून टार्गेट केले जात असल्याने रहिवासी धास्तावले आहेत. शहर हद्दीतील कमल गणपती हॉलजवळील कुलहोम्स अपार्टमेंटमध्ये चोरट्यांनी बंद प्लॅटचे कुलूप तोडून घरातील कपाटातून एक हजार दोनशे रुपयांची रोकड लांबवली. याप्रकरणी शहर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा
रेल्वे कर्मचारी हेमंत शिवाजी आभाळे (32, कुलहोम्स अपार्टमेंट, भुसावळ) यांनी शहर पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, 16 ते 25 दरम्यान गावाला गेल्यानंतर प्लॅटच्या मुख्य दरवाज्याचे कुलूप तोडून चोरट्यांनी प्रवेश करीत हॉलमधील सामानाची फेकाफेक केली तसेच बेडरूममधील कपाटाचे लॉक तोडून त्यातील एक हजार दोनशे रुपयांची रोकड लांबवली. 25 रोजी गावाहून आल्यानंतर घरफोडीचा प्रकार उघडकीस येताच आभाळे यांनी शहर पोलिसात धाव घेत तक्रार नोंदवली. तपास पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संदीप पालवे करीत आहेत.

