दहिगाव येथून 12 अल्पवयीन मुलाचे अपहरण


यावल : यावल तालुक्यातील दहिगाव येथील रहिवासी एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलाचे अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवून फुस लावून पळवून नेत अपहरण केले. हा प्रकार 24 जून रोजी सायंकाळी उघडकीस आला. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात बुधवारी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
दहिगाव, ता.यावल गावातील रहिवासी देविड शशिकांत महाजन (12) हा अल्पवयीन मुलगा आपल्या घरी असताना त्याला अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवून फुस लावून पळवून नेत त्याचे अपहरण केले. हा प्रकार 24 जून रोजी सायंकाळी चार वाजता उघडकीस आला. या मुलाचा सर्वत्र शोध घेण्यात आला मात्र मुलगा कुठेच आढळून न आल्यानंतर यावल पोलीस ठाण्यात बुधवारी शशिकांत शिवाजी महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध फुस लावून पळवून नेत अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक वसीम तडवी करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !