आठ लाखांची लाची मागणी भोवली : अहमदनगर महापालिका आयुक्तांसह दोघांविरोधात गुन्हा : ट्रॅप येताच संशयीत पसार


अहमदनगर : अहमदनगर महानगरपालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे (47, मूळ रा.माजलगाव, जि.बीड) व लिपिक श्रीधर देशपांडे (48) यांच्याविरोधात आठ लाखांच्या लाच मागणी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, ट्रॅपचा संशय येताच दोन्ही संशयीत पसार झाले आहेत तर तोफखाना पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जालना एसीबीच्या वतीने संशयीताचे राहते घर सील करण्यात आले आहे.

बांधकाम परवानगीसाठी पैशाची मागणी
मिळालेल्या माहितीनुसार, बांधकाम परवानगी देण्यासाठी अहमदनगर पालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी लिपिकामार्फत नऊ लाख 30 हजारांची लाच मागितली होती व त्यात आठ लाख रुपयांत तडजोड करणयात आली. एता कन्स्ट्रक्शन फर्मच्या बांधकामासाठी हा परवाना पाहिजे होता. 19 आणि 20 जून रोजी ही रक्कम अहमदनगर पालिका लिपिक शेखर देशपांडे यांच्यामार्फत लाच मागणी करण्यात आली. त्यानंतर या प्रकरणाची जालना एसीबीकडे तक्रार गेल्यानंतर एसीबीने कारवाई सुरू केली. एसीबीच्या कारवाईची कुणकुण लागल्यानंतर पालिका आयुक्त आणि लिपिक हे दोघेही सद्या पसार झालेले आहेत.

तोफखाना ठाण्यात गुन्हा दाखल
दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने या प्रकरणी तोफखाना पोलिसात आयुक्त आयुक्त डॉ. पंकज जावळे (47, मूळ रा.माजलगाव, जि.बीड) व लिपिक श्रीधर देशपांडे (48) यांच्याविरोधात आठ लाखांच्या लाच मागणी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. लिपिक शेखर देशपांडेच्या बुर्‍हाण नगरमधील घरावर एसीबीकडून छापा टाकण्यात आला तर आयुक्ताचं राहतं घर लाचलुचपत विभागाने सील केले आहे. पोलीस अधीक्षक संदीप आटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक किरण बिडवे व सहकार्‍यांनी ही कारवाई केली.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !