सावद्यातील स्वामीनारायण मंदिराचे कोठारी शास्त्री भक्तीकिशोरदासजी यांचे हृदयविकाराने निधन


सावदा :  सावदा शहरातील स्वामीनारायण मंदिराचे कोठारी शास्त्री भक्तीकिशोरदासजी (45) यांचे शुक्रवार, 28 रोजी सकाळी सात वाजता भुसावळ येथील खाजगी रुग्णालयात हृदयविकाराचे निधन झाले. ते एका कथेच्या कार्यक्रमासाठी जात असतांना त्यांना भुसावळनजीक त्यांना त्रास जाणवू लागल्याने त्यांना लागलीच रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यांची प्राणज्योत मालवली.

भक्त परिवार शोकसागरात
भक्तीकिशोरदासजी सावदा स्वामी नारायण मंदिराचे कोठारी व येथील स्वामीनारायण गुरुकुलचे उपाध्यक्ष होते. त्यांनी वेदांत व्याकरण या विषयात संस्कृत या विषतात डबल पीएचडी केली होती ते भागवत कथाकारदेखील होते. त्यांनी सावदासह परिसरात द्वारका, हरिद्वार, काशी आदी विविध ठिकाणी मोठ्या कथेचे आयोजन केले होते. त्यांच्या कथेला हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित राहत. यांनी स्वामीनारायण संप्रदायाचे मोठे कार्य या भागात केले. हिंदू धर्माचा प्रचार तसेच सर्व-धर्माचे समरसतेमध्ये त्यांचा मोठा पुढाकार होता, त्यांना संस्था व स्तरावरील मोठ्या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले असून स्वामीनारायण संप्रदायाचे विविध गुजराती ग्रंथ मराठीत व हिंदीत अनुवादित केले होते. त्यांचेवर गुजरात येथील स्वामीनारायण संप्रदायाचे वडतालधाम येथे शनिवार, 29 रोजी संतपरंपरे प्रमाणे अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांच्या अकाली निधनानंतर सावदा व परिसर तसेच विविध ठिकाणी असलेले भक्त शोकसागरात बुडाले आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !