दुचाकी धक्का लागल्याच्या वादातून भुसावळात प्रौढाला मारहाण


भुसावळ : दुचाकीचा धक्का लागल्याने त्याबाबत जाब विचारल्याच्या रागातून भुसावळातील 47 वर्षीय प्रौढाला मारहाण करीत ठार मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

दोघांविरोधात गुन्हा दाखल
पंकज विजय पाटील (47, शिव कॉलनी, जामनेररोड, भुसावळ) यांच्या तक्रारीनुसार, 13 जून रोजी रात्री 10.30 वाजता संशयीताच्या दुचाकीचा धक्का लागल्याने दुचाकी सरळ चालवता येत नाही का? असा जाब विचारल्याच्या रागातून दोघा संशयीतांनी रस्ता अडवत चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली तसेच हातातील फरशी डोक्यात मारून दुखापत करण्यात आली व जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देण्यात आली. संशयीत रोहित धनराज गोयल व हेमंत पैठणकर, सचिन उर्फ कडक दलाल (सर्व रा.भुसावळ) यांच्याविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार समाधान पाटील करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !