यावल शहरातील श्रीराम नगरात जुगार अड्ड्यावर छापा : दोघांविरोधात गुन्हा
यावल : शहरातील सातोद रस्त्यावर असलेल्या श्रीराम नगरात जुगार अड्ड्यावर पोलिसांच्या पथकाने छापा टाकत सहा हजार 750 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. याप्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई बुधवारी रात्री करण्यात आली.
दोघांविरोधात गुन्हा दाखल
यावल शहरातील सातोद रस्त्यावर श्रीराम नगरात जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांना मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईचे आदेश दिले. पोलीस उपनिरीक्षक मुजफ्फर खान, सहायक फौजदार असलम खान, हवालदार वासुदेव मराठे, राजेंद्र पवार, वसीम तडवी, सुशील घुगे आदींच्या पथकाने जुगार अड्ड्यावरून एक हजार 750 रुपयांची रोख रक्कम तसेच विविध साहित्य असा सहा हजार 750 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला तर संशयीत पसार झाले. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात हवालदार मोहन तायडे यांच्या फिर्यादीवरून आर्यन अशोक बोरेकर व सिद्धार्थ अशोक बोरेकर (दोन्ही रा.श्रीरामनगर) यांच्याविरुद्ध मुंबई जुगार कायदा कलम 12 अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजेंद्र पवार करीत आहे.

