भुसावळ शहरातून अल्पवयीन मुलीस पळवले


भुसावळ : शहरातील गवळीवाडा भागातील 17 वर्षीय अल्पवयीन अज्ञाताने काहीतरी फूस लावून पळवून नेले. ही घटना 30 जून रोजी सकाळी 10.30 वाजेनंतर घडली.

याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी शहर पोलिसात तक्रार दिल्यानुसार त्यांच्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीस 30 रोजी सकाळी 10.30 ते रात्री साडेसात दरम्यान अज्ञाताने काहीतरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेले. तपास पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक निलेश गायकवाड करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !