मुक्ताईनगर तालुक्यात कर्की सीमेवर साडेसहा लाखांचा गुटखा जप्त


मुक्ताईनगर : मुक्ताईनगर तालुक्यातील कर्की सीमा बॉर्डरवर नाका तपासणी नाक्यावर मुक्ताईनगर पोलिसांनी कारवाई करीत चारचाकी वाहनासह सहा लाख 46 हजार 800 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई मंगळवार, 2 जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता करण्यात आली. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

गुटख्याची वाहतूक ऐरणीवर
मुक्ताईनगर तालुक्यातील कर्की सीमा तपासणी नाक्यावर मुक्ताईनगर पोलीस हे नाकाबंदी दरम्यान वाहनांची तपासणी करीत असताना मारोती इको चारचाकी कार क्रमांक (एम.एच.30 बी.बी.1916) मध्ये प्रतिबंधित असलेला गुटखा व पानमसाला आढळला. वाहन आणि गुटखा पानमसाला असा एकूण सहा लाख 46 हजार 800 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस नाईक विजय पढार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कार चालक सुदाम रामराव व्यवहारे (40, रा.फर्दापूर, ता.मोताळा, जि.बुलढाणा) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस नाईक राहुल बोरकर करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !