भुसावळात शाळाबाह्य विद्यार्थिनीला दिला सहाव्या इयत्तेत प्रवेश


भुसावळ  : शासन धोरणानुसार 5 ते 20 जुलै यादरम्यान शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध सुरू असताना अहिल्यादेवी कन्या विद्यालयातील शिक्षक नाना पाटील यांना आदिती चव्हाण (14, भिरूड हॉस्पिटल, भुसावळ) ही विद्यार्थिनी निदर्शनास आली. विद्यार्थिनीला शाळेबाबत प्रवृत्त करीत तिच्या आई-वडिलांशी सकारात्मक चर्चा करण्यात आल्यानंतर गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे, बालरक्षक संजय गायकवाड, शाळेच्या मुख्याध्यापिका मानसी कुलकर्णी आदींच्या उपस्थितीत या विद्यािनिीला सहाव्या इयत्तेत प्रवेश देण्यात आला.

आई-वडिलांच्या डोळ्यातून तरळले आनंदाश्रू
विद्यार्थिनीचे बुके देवून स्वागत करण्यात आले तसेच नवे पुस्तके देऊन तिचा प्रवेश निश्चित करण्यात आला. यावेळी गट शिक्षणाधिकारी वायकोळे यांनी विद्यार्थिनीला मार्गदर्शन करून भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. नाना पाटील यांचे पर्यावरणावरच नाही तर शाळाबाह्य विद्यार्थी बाल रक्षक म्हणूनही त्यांनी कार्य केले असून आतापर्यंत सहा विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून दिला आहे. विद्यार्थिनीला प्रवेश मिळाल्यानंतर आई-वडिलांच्या डोळ्यातून आनंदाळू तरळले.

शिक्षणापासून राहू नये कुणी वंचित
शिक्षणापासून कुणीही वंचित राहू नये यासाठी सातत्याने प्रयत्न असतो. ज्या भागात विद्यार्थी राहतो त्या भागातील शाळेत नाव दाखल करण्याचा प्रयत्न आहे. अशा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिक्षण प्रवाहात आणण्याचेही कार्य सुरू असते. असे नाना पाटील म्हणाले. यावेळी गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे, बाल रक्षक संजय गायकवाड, शाळेच्या मुख्याध्यापिका मानसी कुलकर्णी, शाळेचे पर्यवेक्षक संजीव पाटील, ज्येष्ठ शिक्षक नाना पाटील, वर्ग शिक्षिका नयना पाटील, पालक सतकोर चव्हाण व विद्यार्थिनी अदिती चव्हाण उपस्थित होत्या.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !