भुसावळातील भोळे महाविद्यालयात कारगील विजय दिवस साजरा
भुसावळ : भुसावळ शहरातील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात 26 रोजी कारगील दिवस साजरा करण्यात आला. प्राचार्य डॉ.आर.पी.फालक म्हणाले की, भारत ही संस्कृती, क्षमा आणि धैर्याची भूमी आहे. हा देश आणि त्याचा इतिहास जगासाठी उल्लेखनीय आणि प्रेरणादायी आहे. भारतीयांनी सर्वात कठीण प्रसंगांना तोंड दिले आहे आणि तरीही त्यांचा अभिमान कायम ठेवला आहे. आपल्या सैनिकांनी अनेक लढाया लढल्या आणि जिंकल्या आहेत. असेच एक अविस्मरणीय युद्ध म्हणजे कारगिल. या भूमीला वाचवण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणार्या भारतीय जवानांच्या बलिदानाची आठवण म्हणून 26 जुलै रोजी कारगील दिन साजरा केला जातो, असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थी कल्याण व सांस्कृतिक विभागातर्फे करण्यात आले. प्रास्ताविक प्रा.डॉ.माधुरी पाटील यांनी तर आभार ी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.आरबी.ढाके मानले. याप्रसंगी कारगिल युद्धात शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. राष्ट्रीय सेवा योजनेचे सहाय्यक कार्यक्रमाधिकारी डॉ.जगदीश चव्हाण, महिला कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.माधुरी पाटील, डॉ.अनिल सावळे, प्रा.श्रेया चौधरी, डॉ.डी.एस.राणे, डॉ.गोविंदा पंडित वाघुळदे, प्रा.डॉ.अंजली के.पाटील, प्रा.संजय विठ्ठल बाविस्कर, प्रा.डॉ.जयश्री सरोदे, प्रा.निर्मला वानखेडे, प्रा.खिलचंद धांडे व इतर प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित असल्याचे प्रसिद्धी प्रमुख डॉ.संजय धर्मा चौधरी कळवतात.

