चोपडा ग्रामीण पोलिसांची मोठी कामगिरी : पाच पिस्टल, दहा काडतूसांसह दोघांना बेड्या


जळगाव : चोपडा ग्रामीण पोलिसांनी पाच गावठी पिस्टल व दहा जिवंत काडतूसासह दोघांना अटक केली. आरोपींकडून एकूण दोन लाख 6 हजार 940 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. मोहम्मद लतीफ शेख सलीम (24) व इमरान खान अयुब खान (23, दोन्ही रा. छत्रपती संभाजी नगर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेहत.

गोपनीय माहितीवरून कारवाई
चोपडा तालुक्यातील छात्रसेन लासुर मार्गे उमर्टी येथे दुचाकीने दोघे गावठी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतूस घेऊन येत असल्याची गोपनीय माहिती चोपडा ग्रामीण पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने शनिवार, 27 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजता कारवाई करत संशयित आरोपी मोहम्मद लतीफ शेख सलीम आणि इम्रान खान अयुब खान यांना अटक केली. आरोपींकडून गावठी बनावटीचे पाच पिस्तूल आणि 10 जिवंत काडतूस, धारदार लोखंडी कोयता आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण दोन लाख 6 हजार 940 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर, पोलीस नाईक शशिकांत पाटील, राहुल रणधीर, रावसाहेब पाटील, दीपक शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल अभिषेक सोनवणे, आत्माराम अहिरे यांनी केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !