हतनूरचे पाणी आले ओझरखेडा साठवण तलावात


El agua de Hatnoor llegó al tanque de almacenamiento de Ozarkheda भुसावळ  : वरणगाव-तळवेल उपसा सिंचन योजनेवरील ओझरखेडा साठवण तलावात हतनूर धरणातून वाहून जाणारे पाणी साठवण्यास सुरूवात करण्यात आली आहे. या पाण्याचा परिसरातील शेतकर्‍यांना सिंचनासाठी मोठा लाभ होणार आहे. यंदा 60 टक्के जलसाठा करण्याचे नियोजन असून आतापर्यंत दोन दिवसात 1.5 दलघमी पाण्याची उचल करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

जलपातळी स्थिरावताच होणार उचल
सोमवारी धरणाच्या लाभक्षेत्रात पाणी वाढल्यानंतर दरवाजे उघडण्यात आले असून पूरस्थिती वाढल्याने धरणाची जलपातळी स्थिर नसल्याने पंपींग यंत्रणा थांबविण्यात आली आहे. 2270 अश्वशक्तीच्या पंपांतून जलपातळी स्थिरावल्यावर धरणातून उचल केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले. 2018 च्या पावसाळ्यात 30 टक्के जलसाठा साठवण तलावात झाला मात्र आता सहा वर्षांच्या प्रतिक्षेनंतर या पावसाळ्यात धरणात 60 टक्के जलसाठा केला जाणार आहे. आगामी काळात एकूण 56 दलघमी अर्थात 60 टक्के जलसाठा करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. या योजनेमुळे भुसावळ, बोदवड व मुक्ताईनगर या तीन तालुक्यातील 52 गावांतील 13 हजार 258 हेक्टर क्षेत्राला सिंचनाला लाभ होणार आहे. आगामी काळात तलावात पंप बसवून शेतकरी आगामी काळात पाण्याची उचल करु शकणार आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !