झाडावर गोळीबार केल्याचा व्हिडिओ व्हायरल : गुन्हे शाखेने आवळल्या दोघांच्या मुसक्या


जळगाव : पपईच्या झाडावर गावठी कट्ट्याने फायरिंग करणार्‍या संशयित आरोपीसह त्याच्या मित्राला अटक जळगाव गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या. आरोपींच्या ताब्यातून गावठी कट्टा व चार जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. चोपडा तालुक्यात उनपदेव येथे ही घटना घडल्यानंतर व्हिडिओ व्हायरल झाला व त्यानंतर पथकाने कारवाई केली.

गुन्हे शाखेने केली चोपडा तालुक्यात कारवाई
सोशल मीडियावर एक तरुण निर्जनस्थळी पपईचय झाडावर गावठी कट्ट्याने फायरींग करीत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी पथकाला कारवाईचे निर्देश दिल्यानंतर फौजदार अनिल जाधव, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, हवालदार हरिलाल पाटील, विष्णु बिर्‍हाडे, हेमंत पाटील, प्रदीप सपकाळे, भारत पाटील, प्रदीप चवरे यांच्या पथकाने विशाल राजेंद्र ठाकूर (28, रा.इंदिरा नगर, अडावद) यास ताब्यात घेतले.





आरोपीने गुन्ह्यात वापरलेला गावठी कट्टा रोहन रवींद्र पाटील (30, रा. लोणी, ता. चोपडा, ह.मु.कोनगाव भिंवडी, जि.ठाणे) याच्याकडे असल्याचे सांगितले. त्यानुसार पथकाने भिवंडी येथील कोनगाव येथे जावून रोहन पाटील यास ताब्यात घेण्यात आले. हा कट्टा चोपडा तालुक्यातील लोणी पंचक येथे लपवून ठेवल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने तेथून 30 हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा व दोन हजार रुपये किमतीचे चार जिवंत काडतूस जप्त केले.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !