भुसावळातील वंशिका प्रतिष्ठानतर्फे स्व.मोहम्मद रफी यांना आदरांजली


भुसावळ : शहरातील वंशिका प्रतिष्ठानतर्फे भारतीय संगीत क्षेत्रातील ख्यातनाम गायक स्व.मोहम्मद रफी यांना 44 व्या पुण्यतिथीनिमित्त पांडुरंगनाथ नगर, पूजा कॉम्प्लेक्स येथे श्रद्धांजली वाहण्यात आली. आपल्या आवाजातली जादू दाखवून हिंदी सिनेसृष्टीतील गायकांपैकी सर्वश्रेष्ठ गायकांच्या यादीत मोहम्मद रफींचं नाव घेतले जाते. संगीत क्षेत्रातील अनेक पुरस्कारांनीही त्यांचा गौरव झाला. या पुरस्कारांपेक्षा त्यांना अपेक्षित असलेला रसिकवर्ग त्यांना मोठ्या संख्येने लाभला. 31 जुलै 1980 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने आवाजाच्या जादूगाराचं निधन झाले मात्र आवाजाच्या रुपातून रफी आजही रसिकांच्या मनात जिवंत आहेत.

वंशिका प्रतिष्ठानच्या माध्यमातून जिल्ह्यातील अनेक कलाकारांनी गीत गाऊन स्व.मोहम्मद रफी यांना स्वरांमधून श्रद्धांजली अर्पण केली. याप्रसंगी प्रमुख अतिथी संदीप बडगे यांनी दीपप्रज्वलन केले.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी विवेक नरवाडे, संभाजी सोनवणे, अखिलेश कुमार, निलेश रायपूरे, जितेंद्र उईके, दिलीप क्षीरसागर, हेमंत खरात, रोहित अडकमोल, वैशाली चोपडे, धम्मरत्न चोपडे, संतोष मेश्राम, प्रकाश लोडते, डी.एस.बर्डे, देवा आराख तसेच असंख्य नागरीक उपस्थित होते.


कॉपी करू नका.