डांभूर्णी गावातील विवाहितेने उचचले टोकाचे पाऊल
यावल (गुरुवार, 20 ऑगस्ट 2026) : यावल तालुक्यातील डांभूर्णी गावातील 38 वर्षीय विवाहितेने आपल्या राहत्या घरी गळफास घेतला. हा प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस आला. तातडीने या महिलेला यावल ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी करून तिला मयत घोषित केले. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. छायाबाई ज्ञानेश्वर अहिरे (38) असे मृताचे नाव आहे.
काय घडले डांभूर्णीत ?
डांभूर्णीतील पंडित नगरात ज्ञानेश्वर नंदू अहिरे हे कुटुंबासह राहतात. त्यांच्या पत्नी छायाबाई ज्ञानेश्वर अहिरे (38) यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेतला. हा प्रकार कुटुंबीयांच्या निदर्शनास येताच त्यांना तातडीने तेथून काढून ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी करून मयत घोषित केले.
याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात ज्ञानेश्वर अहिरे यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मृताच्या पश्चात पती, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे. त्यांनी आत्महत्या का केली हे कळू शकले नाही. तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संदीप सूर्यवंशी, किशोर परदेशी करीत आहे.

