शेतशिवारातील वीजतारा चोरीस आळा घाला: भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल जावळे
जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले पत्र
यावल (6 ऑगस्ट 2024) : गेल्या काही महिन्यांपासून रावेर आणि यावल तालुक्यातील शेतशिवारांमध्ये शेतीसाठी वीजपुरवठा करणार्या तारांची मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटना घडत आहेत त्यामुळे शेतकर्यांना मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. वारंवार होणार्या या घटनांमुळे शेतकरी हवालदिल झाले आहे. या पार्श्वभूमीवर परिसरातील शेतकरी बांधवांना होत असलेला त्रासा बद्दल भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा पूर्वचे जिल्हाध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे यांनी थेट जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांना वीजतारा चोरीच्या घटना थांबवण्याची पत्राद्वारे मागणी केली आहे.
जिल्हस पोलीस अधीक्षकांना पत्र
भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांनी जिल्हा पोलिस अधिक्षकांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, गेल्या काही महिन्यांपासून रावेर आणि यावल तालुक्यातील शेतशिवारांमध्ये शेतीसाठी वीज.पुरवठा करणार्या तारांची मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटना घडत आहेत चोरीच्या गुन्ह्यांमध्ये कोणतीही कारवाई झाल्याचेही दिसून येत नसल्याने चोरट्यांचे मनोबल वाढले आहे. शेतातील वीज तारांची चोरी झाल्यामुळे शेतकरी बांधवांचा वीजपुरवठा खंडित होत असुन व तो सुरळीत करण्यासाठी त्यांना अनेक बाधा येत आहे.
या चोरीच्या घटनांमुळे रावेर तालुक्यातील शेतकरी बांधवांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या भुरट्या चोरां विरुद्ध कारवाई करून व पोलीस गस्त वाढवून चोरट्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्यासाठीची मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे.