सुकी धरणाचे आमदार शिरीष चौधरी यांच्याहस्ते जलपुजन
रावेर (6 ऑगस्ट 2024) : यंदा वरुणराजाची चांगली कृपा राहिल्याने या परिसरात शेतकरी सुखावला आहे. गारबर्डी येथील सुकी धरण पूर्ण भरून ओसंडून वाहू लागल्यामुळे परिसरातील शेतकरी आनंदीत झाले आहेत. प्रतिवर्षाप्रमाणे परिसरातील शेतकरी बांधवांसोबत आमदार शिरीष चौधरी मित्र परिवारातर्फे जलपूजन सोहळा साजरा करण्यात आला. आमदार शिरिष चौधरी यांच्याहस्ते गारबर्डी सुकी धरणाचे जलपूजन करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
यावेळी अरुणा चौधरी, धनंजय चौधरी, लिलाधर चौधरी, शेखर पाटील, सर्फराज तडवी, ज्ञानेश्वर बर्हाटे, प्रशांत पाटील, योगेश पाटील, विलास तायडे, गोंडू महाजन, रमेश महाजन, काँग्रेस तालुकाध्यक्ष डॉ.राजेंद्र पाटील, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष किशोर पाटील, सुनील फिरके, राजू सुवर्णे, प्रल्हाद बोंडे, सुनील कोंडे, देवेंद्र चोपडे, राहुल तायडे, रोहिदास कोळी, ज्योती भालेराव, रतन बारेला, कामील तडवी, जावेद जनाब, भालचंद्र भंगाळे, रशीद तडवी, मुकेश पाटील, लियाकत जमादार, विकास धांडे, विकास भंगाळे, पीरन तडवी, तुकाराम बोरोले, अजित पाटील, चंद्रकांत भंगाळे, डॉ.सुरेश पाटील, अनिल महाजन, मिलिंद नेहेते, नथू तडवी आदी उपस्थित होते.
मधुकरराव चौधरी दूरदुष्टीमुळे परिसर हिरवा
शेतकरी बांधवांनी लोकसेवक मधुकरराव चौधरी यांच्या दूरदुष्टीमुळे आपल्याला आज हा परिसर हिरवा दिसत असल्याची भावना व्यक्त केली. या धरणामुळे पाटचारीच्या माध्यमातून शेतकर्यांना पाणी दिले जाते त्यामुळे सर्व जमीन ओली झाली. विहिर ट्यूबवेलला पाणी आल्याने सर्व परिसर सुजलाम सुफलाम झालं अश्या अनेक शेतकरी बांधवांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.