महसूल पंधरवडा : ई-पीक पाहणी, डिजीटल क्रॉप सर्व्हेबाबत तहसीलदार निता लबडे यांनी केले मार्गदर्शन


भुसावळ (9 ऑगस्ट 2024) : भुसावळ तालुक्यातील विल्हाळे येथे कृषी मार्गदर्शन कार्यक्रत अंर्तगत शेतकरी बांधवासाठी शेती व शेतीविषयक, सेंद्रीय शेती बाबत, बी-बियाणे, खते, पशुसंवर्धन, पीक सरक्षंण, धान्य साठवण कृषी उत्पादनाचे मुल्यवर्धन प्रक्रिया, बाजारपेठ उपलब्धता आदींबाबत विशेष शिबिर घेण्यात आले. या शिबिराला तहसीलदार निता लबडे यांची प्रमुख उपस्थिती होती. लबडे यांनी ई-पीक पाहणी, डिजीटल क्रॉप सर्व्हे संबधी मोबाईल अ‍ॅप्लीकेशनबाबत शेतकरी खातेदारांना माहिती दिली.

दहा गावातील महिलांना प्रशिक्षण
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांनी सक्षम होणे कामी उद्योग करावे, सेंद्रिय खत ही काळाची गरज आहे व याची निर्मिती करण्याचे प्रशिक्षण वेल्हाळे गावातील व अन्य 10 गावातील महिलांना देण्यात आले. त्याचा उपयोग करून मोठ्या प्रमाणात सेंद्रिय खत निर्मिती करावी, यासाठी बाहेरच्या शेतकर्‍यांना निर्यात करता येईल एवढा उद्योग पुढे न्यावा, यातून पैसा, रोजगार मिळेल, शेतीचे निव्वळ उत्पन्न वाढेल व आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल, एक एक गाव आर्थिक सक्षम झालें तर पुर्ण तालुका व जिल्हा सक्षम होईल यातून पुढील पिढीला चालना मिळेल अशी शासनाकडील असलेल्या विविध योजनेविषयक माहिती तहसीलदारांनी दिली.

कृषी विभागाकडून मार्गदर्शन
कृषी विभागाकडुन तालुका कृषी अधिकारी व कर्मचारी यांनी सुध्दा मार्गदर्शन केले. शासनाच्या कृषी विभागाशी निगडीत विविध प्रकाराच्या योजनांची माहिती यावेळी दिली. विल्हाळे ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शेतकरी खातेदार, शेतमजुर, अंगणवाडी सेविका, पिंपळगाव मंडळ अधिकारी, तलाठी, कृषी सहाय्यक, पोलिस पाटील, कोतवाल यांची उपस्थिती होती.


कॉपी करू नका.