बांग्लादेशात हिंदूवर अत्याचार : 16 ऑगस्ट रोजी जळगाव जिल्ह्यात कडकडीत बंद
Atrocities against Hindus in Bangladesh : Strict shutdown in Jalgaon district on August 16 जळगाव (10 ऑगस्ट 2024) : बांग्लादेशातील अस्थिर वातावरणामुळे हिंदूंवर अत्याचार वाढले असून या विरोधात सकल हिंदू समाजाने एकत्रीत बैठक घेत शुक्रवार, 16 ऑगस्ट रोजी जळगाव जिल्हा कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील माहिती महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज यांनी पत्रपरिषेदेत माहिती दिली. जळगाव येथील पद्मावती मंगल कार्यालयात सकल हिंदू परिषदेतर्फे शुक्रवार, 9 रोजी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
केंद्राने हिंदूंना संरक्षण द्यावे
बांग्लादेशात अनेक हिंदूंवर अत्याचार होत असल्याबाबतचे व्हिडीओ प्रसारित होत असल्याची माहिती देऊन जनार्दन हरी महाराज पुढे म्हणाले की, या प्रकरणी एक माणूस म्हणून आपण जळगाव जिल्हा शुक्रवार, 16 ऑगस्ट रोजी कडकडीत बंद पाळणार आहोत. याबाबत आम्ही आवाहन करीत आहोत तसेच केंद्र सरकारने बांगलादेश येथील हिंदूंना संरक्षण देण्याबाबत भूमिका जाहीर करावी. याबाबत केंद्र सरकारने मानवाधिकार संघटनेने भूमिका मांडावी, असेही ते म्हणाले.

चुकीचे फलक लागणार नाहीत याची काळजी घेण्याचे आवाहन
वक्फ बोर्डाविषयी केंद्र सरकार कायदा आणत आहे. याबाबत आम्ही हिंदू समाजातर्फे आभारी आहे. कडकडीत बंद पळताना जिल्ह्यातील वातावरण खराब होणार नाही, चुकीचे फलक लागणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन कार्यकर्त्यांना जनार्दन हरी महाराज यांनी केले आहे. पत्रकार परिषदेला
महानुभाव शास्त्रीजी, श्याम चैतन्य महाराज, अनंत प्रकाश, कोठारीजी, ललित चौधरी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.