दोन गावठी कट्टे व काडतूसांसह परप्रांतीय तरुण चोपडा पोलिसांच्या जाळ्यात
Two village youths with knives and cartridges in Chopda police net चोपडा (11 ऑगस्ट 2024) : चोपडा शहर पोलिसांनी दोन गावठी कट्टे, दोन जिवंत काडतूस, चाकू आणि चोरीची दुचाकीसह परप्रांतीय त्रिकूटाला अटक केली. चोपडा तालुक्यातील चुंचाळे रोडवर स्वामी समर्थ केंद्राच्या पुढे रविवार, 11 रोजी सकाळी 8.20 वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
गोपनीय माहितीवरून कारवाई
चोपडा शिवारात चुंचाळे रस्त्यावरील स्वामी समर्थ केंद्राच्या पुढे शहर पोलिसांनी सापळा लावला. ईश्वर किसन डावर (19, आसरापानी), पप्पू जयराम डावर, (18, मध्य प्रदेश) यांच्यासह एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून दोन गावठी कट्टे, दोन जिवंत काडतूस, एक चाकू आणि एक दुचाकी असा एकूण एक लाख 69 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. कॉन्स्टेबल रवींद्र बोरसे यांच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय एकनाथ भिसे करीत आहेत.

