यशाचा मार्ग ध्येयाच्या दिशेने जातो जीवनात ध्येय निश्चित करा : प्रा.जयेंद्र लेकुरवाळे
भुसावळ (13 ऑगस्ट 2024) : विद्यार्थ्यांनो जीवनात ध्येय निश्चित केल्याशिवाय तुमचे भविष्य उज्वल होणार नाही. कारण यशाचा मार्ग हा ध्येयपूर्तीच्याच दिशेने जात असतो. त्यासाठी ध्येय निश्चित करा, असे आवाहन प्रा.डॉ.जयेंद्र लेकुरवाळे यांनी केले ते प्रागतिक विचार मंच व डॉ.मानवतकर बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ‘गौरव यशवंतांचा’ या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
यांची विचार मंचावर उपस्थिती
भुसावळ शहरातील माळी मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रागतिक विचार मंचचे अध्यक्ष जे.पी.सपकाळे होते. समारंभाचे स्वागताध्यक्ष डॉ.राजेश मानवतकर हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी सभापती राजेंद्र चौधरी, मराठी साहित्याचे अभ्यासक व विचारवंत प्रा. डॉ.जतीन मेढे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र चौधरी, निवृत्त पोलीस अधिकारी दिलीप सूर्यवंशी, अटल प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.डॉ.सुनील नेवे, माजी नगराध्यक्ष सुनील काळे, डॉ.युनूस फलाई, माजी गटविकास अधिकारी डॉ.आर.पी.तायडे, ग.स.संचालक योगेश इंगळे, माजी सभापती किशोर गायकवाड, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संतोष माळी आदी उपस्थित होते. भुसावळ शहर व तालुक्यातील दहावी व बारावीच्या परीक्षेत अनुसूचित जातीमधून द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा हा गौरव यशवंत समारंभ आयोजित करण्यात आला.
मुलांच्या शैक्षणिक प्रगतीकडे लक्ष द्या
प्रा. डॉ.लेकुरवाळे पुढे म्हणाले की, पालकांनो आपल्या मुला-मुलींना शैक्षणिक संसाधने उपलब्ध करून द्या. भौतीक सुविधा नसल्या तरी चालतील परंतु त्यांच्या जिद्दीला आणि परिश्रमाला बळ कसं मिळेल हा मानसिक आधार त्यांना द्या. त्यांच्या शैक्षणिक प्रगतीकडे जातीने लक्ष द्या. ते काय करतात यावर लक्ष ठेवा. पालक होऊन अंतर ठेवून बोलण्यापेक्षा आपल्या मुला-मुलींची मित्र म्हणून संवाद साधा, असे आवाहनही त्यांनी पालकांना केले. याप्रसंगी स्वागताध्यक्ष डॉ.राजेश मानवतकर, प्रा.डॉ.सुनील नेवे, जे.पी.सपकाळे आदींनीही मनोगत व्यक्त केले.
यांचे यशस्वीतेसाठी परिश्रम
शहर व तालुक्यातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व त्यांच्या पालकांची उपस्थिती होती. अत्यंत देखण्या व नियोजनबद्ध असलेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ.जतीन मेढे यांनी केले तर गुणगौरव समारंभाचे सूत्रसंचालन अनुक्रमे समाधान जाधव, विनोद बार्हे, पप्पू वानखेडे यांनी केले. आभार देवेंद्र तायडे यांनी मांडले. यशस्वीतेसाठी दिलीप सुरवाडे, देवेंद्र तायडे, डॉ.आर.पी.तायडे, संघरत्न सपकाळे, प्रा.आर.बी.इंगळे, निलेश रायपुरे, भारती अवचारे, मीना तायडे, प्रज्ञा वानखेडे आदींनी परिश्रम घेतले.