फैजपूर शहर 16 ऑगस्टला बंदचे आवाहन : प्रांतांना निवेदन


फैजपूर (13 ऑगस्ट 2024) : बांग्लादेशात आरक्षण विरोधी आंदोलनाचे आडून अल्पसंख्य हिंदूवर जे अनन्वित अत्याचार होत आहेत त्यात हिंदू जळत आहेत, मरत आहेत व स्त्रियांवर अत्याचार होत आहेत. या सर्व प्रकाराच्या निषेधार्थ 16 ऑगस्ट रोजी जळगाव जिल्हा बंदची हाक सकल हिंदू समाजाने दिली आहे. त्यात फैजपूर शहराचाही समावेश आहे. हिंदू आदी अल्पसंख्य लोकांवर होणार्‍या अत्याचारांच्या निवारणार्थ शासकीय स्तरावरून उचित संदेश शासन दरबारी आपल्या माध्यमातून जावा, अशी मागणी निवेदनाद्वारे सकल हिंदू समाजाच्या वतीने फैजपूर प्रांताधिकारी बबनराव काकडे यांच्याकडे करण्यात आली.

यांची होती उपस्थिती
यावेळी महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज म्हणाले की, बांग्लादेशातील हिंसाचार हा मानव धर्माला काळिमा फासणार आहे. याचा आम्ही सनातन सकल हिंदू समाजा तर्फे जाहीर निषेध करीत आहोत व पुकारला बंद आम्ही शांततेत व कडकडीत पाळू. प्रसंगी सुरेशशास्त्री मानेकर बाबा, शास्त्री अनंत प्रकासदासजी, शास्त्री धर्म किशोरदासजी, अ‍ॅड.कालिदास ठाकूर, योगेश भंगाळे, पंकज नारखेडे, डॉ.भरत महाजन, डॉ.शेखर पाटील, प्रतीक भिडे, लोकेश कोल्हे, प्रा.जी.के.महाजन, देवेंद्र जोशी, बी.के.चौधरी, निलेश राणे, नीरज झोपे, रितेश चौधरी, किरण चौधरी, योगेश बोरोले, डॉ.नरेंद्र कोल्हे, नितीन राणे, पिंटू तेली, रामा होले, पिंटू मंडवाले, निलेश चौधरी, जयेश कोल्हे, कल्पेश सराफ, तुषार भारबे, संदीप भारंबे आदी मान्यवर उपस्थित होते.


कॉपी करू नका.