32 वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष दाखवत अत्याचार : चोपडा शहरातील घटना


32-year-old woman raped while luring her into marriage: Incident in Chopra city चोपडा (16 ऑग्स्ट 2024) : 32 वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वेळोवेळी अत्याचार करण्यात आला तसेच पीडीतेसह तिच्या मुलांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी एकाविरुद्ध चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी नीलकंठ शिरसाठ या संशयीताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

ठार मारण्याची धमकी देत अत्याचार
चोपडा शहरातील एका परिसरात 32 वर्षीय पीडीता मुला-बाळांसह वास्तव्याला आहे. संशयित नीळकंठ गंभीर शिरसाठ याने महिलेचा विश्वास संपादन करीत 2022 ते 12 ऑगष्ट 2024 दरम्यान वेळोवेळी लग्नाचे आमिष दाखवीत शारीरिक संबंध ठेवले. यांनतर महिलेला संशयित नीलकंठ शिरसाठ याने यापुढे मला फोन करू नको, असे सांगून तुला आणि तुझ्या मुलांना मारून टाकेल, अशी धमकी दिली.

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने चोपडा शहर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. तपास पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वालटे करीत आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !