जळगावात बाईक शोरूमवर दगडफेक ; निषेध मोर्चाला गालबोट
Stone pelting on bike showroom in Jalgaon ; Cheek to the protest march जळगाव (16 ऑगस्ट 2024) : बांगलादेशातील हिंदूवर होणार्या अत्याचाराच्या निषेधार्थ शुक्रवार, 16 रोजी सकल हिंदू समाजाने बंदची हाक दिली आहे. जळगावातही कडकडीत बंद पाळण्यात आला असून जळगाव शहरात आज सकल हिंदू समाजाच्या वतीने काढण्यात आलेल्या निषेध मोर्चादरम्यान होंडा कंपनीचे दुचाकी विक्रीचे शोरूम सुरू असल्याचे दिसल्यानंतर तरुणांनी शोरूमवर दगड मारल्याने शोरूमच्या काचा फुटल्या. या प्रकारानंतर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
निषेध मोर्चादरम्यान भिरकावले दगड
बांगलादेशात हिंदू अल्पसंख्याकांवर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात सकल हिंदू समाजाच्या वतीने शुक्रवारी जळगाव जिल्हा बंदची हाक देण्यात आली. जळगाव शहरात हिंदू समाजाच्या वतीने शुक्रवारी सकाळी निषेध मोर्चा काढण्यात आला. याच दरम्यान मोर्चात काही तरुणांकडून उघडे असलेल्या बाईकच्या शोरूम वर दगडफेक करण्यात आली. या घटनेनंतर पोलिसांकडून सौम्य लाठी चार्ज करण्यात आला.

दगडफेकीच्या घटनेनंतर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मार्गस्थ करण्यात आला. दगडफेकीनंतर मोर्चात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला.
