बोरींगचे साहित्य लांबवणारी टोळी एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात


जळगाव : बोरींगचे साहित्य लांबवणार्‍या टोळीच्या जळगाव एमआयडीसी पोलिसांच्या गस्ती पथकाने मुसक्या आवळल्या असून आरोपींच्या ताब्यातून रीक्षासह बोरिंगचे साहित्य मिळून तीन लाख 10 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. तिघा आरोपींना न्यायालयाच्या आदेशाने नशिराबाद पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

संशयावरून आरोपींना अटक
जळगाव शहरात मेहरुण येथील रत्नाकर नर्सरी जवळ ऑटो (एम.एच.19.व्ही.5153) बोरींगचे साहित्य घेवून जात असताना एमआयडीसी पोलिसांच्या गस्ती पथकाला संशय आला. रीक्षा चालकास पोलिसी खाक्या दाखवताच त्याने हे सर्व साहित्य नशिराबाद येथून चोरून आणल्याची कबुली दिली. एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, रामकृष्ण पाटील, एएसआय आनंदसिंग पाटील, मनोज सुरवाडे, किशोर पाटील, हेमंत कळसकर यांच्या पथकाने संशयीत शेख फिरोज शेख इकबाल (22), शेख आसीम गुलाम पिंजारी (23), नुर मेहबुब खाटील (65) यांचा शोध घेत मध्यरात्रीच्या सुमारास अटक केली आहे.


कॉपी करू नका.