पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थींना दिलासा : पहिला हप्ता प्राप्त
भुसावळ : पंतप्रधान आवास योजनेतंर्गत भुसावळ शहरातील 22 लाभार्थींना 40 हजारांचा पहिला हप्ता मिळाल्याने लाभार्थींना भुसावळचे नगराध्यक्ष रमण भोळे यांचे आभार मानत त्यांचा सत्कार केला. याकामी मुख्याधिकारी करुणा डहाळे यांचेही सहकार्य लाभल्याने त्यांचेही आभार मानण्यात आले.
22 लाभार्थींना मिळाला पहिला हप्ता
भुसावळ शरतील पंतप्रधान आवास योजनेतंर्गत नगर पालिकेमार्फत एकूण 48 लाभार्थींना घर बांधकाम करण्यासाठी परवानगी पत्र देण्यात आले असून त्यातील 22 लाभार्थींनी आपल्या घराचे काम ओटा लेव्हलपर्यंत करीत तसा नगरपालिकेला अर्ज केला होता. नगरपालिका मुख्याधिकारी करुणा दहाडे यांनी स्वतः बांधकामाची पाहणी करून ओटा लेव्हल पर्यंतचे काम झाल्याची खातरजमा झाल्यानंतर 22 लाभार्थींच्या बँक खात्यात 40 हजार रुपयाचा पहिला हफ्ता जमा करण्यात आला त्यामुळे लाभार्थींनी नगरपालिकेत येऊन लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे यांचा सहृदय सत्कार केला. प्रसंगी नगरसेवक किरण कोलते, पिंटू ठाकूर, दीपक धांडे, देवा वणी, अजय नागराणी, दिनेश नेमाडे निकी बत्रा आदींची उपस्थिती होती.



