चाळीसगावात उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबिर : मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची उपस्थिती
शिबिराचा लाभ घेण्याचे आमदार मंगेश चव्हाण यांचे आवाहन
चाळीसगाव (3 सप्टेंबर 2024) : राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुध व्यवसाय विकास विभागाचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे बुधवार, 4 सप्टेंबर रोजी चाळीसगाव दौर्यावर येत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखालील राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्ष यांच्या सहकार्याने व आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या संकल्पनेतून भारतीय जनता पार्टी चाळीसगाव व निरामय सेवा फाउंडेशन यांच्या माध्यमातून भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याहस्ते सकाळी 11 वाजता होईल.
नामांकीत डॉक्टरांकडून तपासणी
आरोग्य तपासणी शिबिरास वाडिया हॉस्पिटल मुंबई व लाईफ केअर हॉस्पिटल नाशिक येथील नामांकित सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरांकडून तपासणी करण्यात येणार आहे. या आरोग्य तपासणी शिबिराचे लाभ घेण्याचे आवाहन चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी केले आहे.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक शेजारी मैदानावर आरोग्य शिबिर होत आहे. या तपासणी शिबिरामध्ये मोफत तपासणी करण्याबरोबरच विविध आरोग्य समस्यांवर निदान तसेच महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत मोफत शस्त्रक्रिया देखील करण्यात येतील. बुधवारी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत तपासण्या करण्यात येणार आहेत. चाळीसगाव प्रथमच मुंबई व नाशिक येथील नामवंत सुपर स्पेशलिस्ट डॉक्टरांकडून मोफत आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. जनतेने या तपासणी शिबिराचा लाभ घेण्याचे आव्हान शिवनेरी फाउंडेशन, भारतीय जनता पार्टी चाळीसगाव व आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी केले आहे.