मुंबईत सीबीआयची मोठी कारवाई : जीएसटी अधीक्षकासह तिघांना 60 लाखांची लाच घेताना अटक


Big operation of CBI in Mumbai: GST Superintendent along with three arrested for accepting bribe of 60 lakhs मुंबई (8 सप्टेंबर 2024) : मुंबईतील करचोरी विरोधी शाखेत नियुक्त केलेल्या केंद्रीय वस्तू व सेवा कर अधीक्षकासह तीन आरोपींना 60 लाखांची लाच घैताना सीबीआयने अटक केल्याने खळबळ उडाली आहे. आरोपींना हवालामार्फत लाचेचे पैसे देण्यात आले व त्यांनी 60 लाखांपैकी 33 लाख रुपयांची लाच घेतली होती. जीएसटी अधीक्षक सचिन गोकुळका, चार्टर्ड अकाउंटंट राज अग्रवाल आणि अभिषेक मेहता अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

सहा अधिकार्‍यांविरोधात गुन्हा
तिघांना लाच म्हणून 20 लाख रुपयांची रक्कम स्वीकारताना अटक करण्यात आली. एका तक्रारीवरून सीबीआयने सीजीएसटीच्या सहा अधिकार्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यात अतिरिक्त आयुक्त दीपककुमार शर्मा, सहआयुक्त राहुल कुमार, गोकुळका, बिजेंद्र जानवा, निखिल अग्रवाल, नितीनकुमार गुप्ता, अग्रवाल आणि मेहता यांचा समावेश होता.

लाचेचा दुसरा हप्ता घेताना कारवाई
आरोपी जीएसटी अधिकारी सचिन गोकुळका हे मुंबई पश्चिम आयुक्तालयाचे सीजीएसटी (अँटी-इव्हेशन) अधीक्षक आहेत. लाच घेताना दोन खासगी व्यक्तींसह त्यांना पकडण्यात आले. सीजीएसटी चौकशीत अटक टाळण्यास मदत करण्यासाठी त्यांनी तक्रारदाराकडून 60 लाख रुपयांची लाच मागितली होती. मात्र, लाचेच्या रकमेचा दुसरा हप्ता म्हणून 20 लाख रुपये घेताना ते सीबीआयच्या जाळ्यात अडकले. सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, लाचेच्या एकूण रकमेपैकी 30 लाख रुपये हे त्यांना आधीच हवाला मार्गाने देण्यात आले.

18 तास डांबून ठेवले
एका व्यावसायिकाच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदाराने आरोप केला की त्याला 4 सप्टेंबर रोजी सीजीएसटीच्या सांताक्रूझ कार्यालयात रात्रभर कोंडून ठेवले होते. 18 तास डांबून ठेवल्यानंतर 5 सप्टेंबर रोजी त्याची सुटका करण्यात आली अशी माहिती तक्रारदाराने दिली. डांबून ठेवल्यावर अधिक्षक सचिन गोकुळकाने अटक न करण्यासाठी 80 लाख रुपयांची लाच मागितली. मात्र ही रक्कम 60 लाखांवर आणण्यात आली. अधीक्षक सचिन गोकुळकाचे इतर तीन सहकारी देखील तक्रारकर्त्यावर दबाव आणण्यासाठी त्याच्यासोबत सामील झाले होते. त्यांनी वारंवार बळाचा वापर केला आणि शिवीगाळ केल्याची तक्रार तक्रारकर्त्याने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !