यावल शेतशिवारात 65 वर्षीय वृध्दाचा मृतदेह आढळला


यावल (22 सप्टेंबर 2024) : शहरातील बोरावल गेट जवळील जलशुद्धीकरण केंद्रामागील बाजूस राहणार्‍या 65 वर्षीय वृध्दाचा मृतदेह शनिवारी यावल शेत शिवारात आढळला. वृद्ध हा सरपण घेण्यासाठी शेत शिवारात गेल्याचे कुटुंबाने सांगितले. यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. चमार्‍या दशरथ बारेला (65) असे मयताचे नाव आहे.

यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
चमार्‍या हे यावल शहरातील बोरावल गेट जवळील जलशुद्धीकरण केंद्राच्या मागे राहत होते. दरम्यान कुटुंबाने सांगितले की, ते सरपण घेण्यासाठी जंगलात गेले होते मात्र नंतर ते घरी परतलेच नव्हते त्यांचा शोध घेण्यासाठी कुटुंब गेले असता त्यांचा मृतदेह आढळला. याबाबत यावल पोलीस ठाण्यात गजानन फुलसिंग बारेला यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संदीप सूर्यवंशी करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !