बँकेत आलेल्या महिलेची 24 हजारांची रोकड लांबवली : यावल शहरातील घटना


यावल (22 सप्टेंबर 2024) : कोळन्हावी, ता.यावल येथील रहिवाशी भिकुबाई अरुण सोळंके (53) ही महिला शनिवारी यावल शहरात सातोद रस्त्यावरील सेंट्रल बँकेत पैसे भरण्यासाठी आली असता सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास महिला पैसे जमा करण्याकरिता स्लीप भरत असताना गर्दीचा फायदा घेत कुणीतरी अज्ञात चोरट्याने हातचालाकी करून महिलेच्या पिशवीतील 24 हजार 270 रुपयांची रोकड, आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड व वैभव लक्ष्मी महिला बचत गटाचा शिक्का चोरी केला.

अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल
हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर महिलेने यावल पोलीस ठाणे गाठले. यावल पोलीस ठाण्यात महिलेच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक वसीम तडवी करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !