दीपनगरात लोखंडी बीम चोरताना दोघांना अटक : वाहनासह सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त


Two arrested while stealing iron beam in Deepnagar: Goods worth half a lakh along with vehicle seized भुसावळ : भुसावळ तालुक्यातील दीपनगर प्रकल्प परिसरातून 18 हजार 750 रुपये किंमतीचा लोखंडी बीम चोरताना दोघांना सुरक्षा रक्षकांनी छोटा हत्ती वाहनासह पकडले. ही घटना शनिवार, 21 सप्टेंबर रोजी सकाळी 7.30 वाजता घडली. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. संशयीतांना न्यायालयाने दोन दिवसांची (सोमवारपर्यंत) पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

सुरक्षा रक्षकांनी दोघांना पकडले
भुसावळ तालुक्यातील दीपनगर प्रकल्पातील भेलयार्ड परिसरात छोटाहत्ती वाहन (क्रमांक एम.एच.19 एस 6787) मधून चोरट्यांनी 18 हजार 750 रुपये किंमतीचा लोखंडी बीम चोरून वाहनात टाकल. ही घटना शनिवार, 21 सप्टेंबर रोजी सकाळी 7.30 वाजता सुरक्षा रक्षकांच्या निदर्शनास आल्यानंतर संशयित आरोपी नसीर शहा जनाब शहा फकीर (27, रा.शहीद चौक फेकरी. ता.भुसावळ) व सोपान रामदास भुसारी (33, रा.निंभोरा, ता.भुसावळ) यांना पकडण्यात आले व भुसावळ तालुका पोलिसांना सूचित करण्यात आले दीपनगर प्रकल्पाचे सुरक्षा अधिकारी भैय्यासाहेब मोरे यांनी भुसावळ तालुका पोलिसात तक्रार दिल्यावरून दोघांविरोधात शनिवारी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींना न्यायालयात हजर केले असता सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार श्यामकुमार मोरे करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !