शेतकर्‍यांच्या पशूधनावर डल्ला मारणारी कुसूंब्यातील चौकडी रावेर पोलिसांच्या जाळ्यात


रावेर (24 सप्टेंबर 2024) : रावेर तालुक्यातील कुसुंबा पाझर तलावानजीक झालेल्या बकर्‍या चोरीप्रकरणी कुसुंबा येथील चौघांना अटक करण्यात आली. आरोपींकडून 17 हजार रुपये किंमतीच्या बकर्‍या हस्तगत करण्यात आल्या. रावेर तालुक्यातील मुंजलवाडी येथील मेंढपाळ गोपाल अर्जुन पिसाळ हे त्यांच्या मालकीच्या बकर्‍या कुसुंबा बु.॥ गावी पाझर तलावाजवळ जंगलात चारत असतांना तीन बकर्‍या कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याने रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

चोरट्यांची चौकडी जाळ्यात
राावेर पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल यांनी गुन्हे शोध पथकाला निर्देश दिल्यानंतर मुंजलवाडी, कुसुंबा, लालमाती, रसलपूर, अभोडा परिसरात पथक अज्ञात आरोपींचा शोध घेत असताना शोध पथकाने तालुक्यातील कुसुंबा खुर्द येथून गोपनीय माहितीच्या आधारे तन्वीर रफिक तडवी (19), शरीफ जहाबाज तडवी (25), कलीम हमीद तडवी (33), अजरुद्दीन महमूद तडवी (20, सर्व रा.कुसुंबा खुर्द) यांना अटक करण्यात आली. आरोपीतांना विश्वासात घेवुन विचारपुस केली असता 17 हजार रुपये किंमतीच्या तीन बकर्‍या काढून दिल्या.

यांच्या पथकाने केली कारवाई
ही कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, रावेर पोलीस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील हवालदार रवींद्र वंजारी, कॉन्स्टेबल सचिन घुगे, विशाल पाटील, प्रमोद पाटील, महेश मोगरे यांच्या पथकाने ही कारवाई केली. तपास हवालदार सिकंदर तडवी करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !