यावल शहरातील 28 वर्षीय तरुणाने घेतली भुसावळच्या तापीत उडी


यावल (25 सप्टेंबर 2024) : शहरातील बोरावल गेट भागातील रहिवासी 28 वर्षीय तरुणाने मंगळवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास भुसावळ येथील तापी नदीच्या पुलावरून नदीत उडी घेतली. हा तरुण दुचाकीव्दारे तेथे गेला होता व त्याने पुलावर आपली दुचाकी लावुन पुलावरुन उडी घेतली. हा प्रकार नागरिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी फैजपूर पोलिसांना माहिती दिली. पोलीस व यावल शहरातील नागरिक तरुणाचा नदीपात्रात शोध घेत आहे.

बेपत्ता तरुणाचा तापी पात्रात शोध
यावल शहरातील बोरावल गेट परिसरात लखन संजय कोळी (28) हा आई-वडील, पत्नी व दोन मुलांसह राहत होता. हा तरुण मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता आपली मोटरसायकल (क्रमांक एम. एच. 19 बी. झेड. 4631) घेऊन भुसावळला गेला आणि त्याने भुसावळ जवळील तापी नदीच्या पुलावर मोटरसायकल लावली व तेथून नदीपात्रात उडी घेतली. हा प्रकार नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीने फैजपूर पोलिसांना माहिती दिली. फैजपूर पोलिसांनी घटनास्थळ गाठले व हा तरुण यावल शहरातील बोरावल गेट भागातील असल्याचे समजतात शहरातील अनेक नागरिकांनी नदीपात्राकडे धाव घेतली.

रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध नदीत सुरू होता मात्र तो मिळून आला नाही. बुधवारी सकाळी पुन्हा नदीपात्रात त्याचा शोध घेतला जाणार आहे, असे पोलिसांनी सांगितले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !