लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात पुढील महिन्यात दोन महिन्यांची रक्कम जमा होणार ! : उपमुख्यमंत्री अजित पवार
Two months’ amount will be deposited in the bank account of beloved sisters next month ! : Deputy Chief Minister Ajit Pawar परळी (01 ऑक्टोबर 2024) : भाऊबीजेची ओवाळणी म्हणून लाडकी बहिण योजनेचे ऑक्टोबर व नोव्हेंबर या महिन्याचे तीन हजार रुपये 10 ऑक्टोबर रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होतील, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. परळी, जि.बीड येथे जन सन्मान यात्रेच्या सभेप्रसंगी ते बोलत होते.
पुढील पाच वर्ष योजना सुरूच राहणार
मंगळवारी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसन्मान यात्रेचे परळी शहरात जोरदार स्वागत करण्यात आले. त्यानंतर येथील वैद्यनाथ महाविद्यालयासमोरील प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या लाडकी बहिणी व नागरिकांच्या संवाद सभेत अजितदादा म्हणाले की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद पडू देणार नाही. पुढील पाच वर्ष ही चालू राहील, असा शब्द राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिला.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित दादा पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, आमदार विक्रम काळे ,अंबाजोगाईचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, अडवोकेट विष्णुपंत सोळंके, राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण , गोविंदराव देशमुख, बबन लोमटे, फारुख पटेल, शिवाजी सिरसाट, परळी नगरपरिषदेचे माजी गट नेते वाल्मीक कराड, माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख, बाजीराव धर्माधिकारी, राजाभाऊ पौळ, लक्ष्मण पौळ, वैजनाथ सोळंके, सुशांत पवार, संध्या सोनवणे, संगीता तूपसागर यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
दोन हप्त्यांच्या रकमेतून सुरू केला व्यवसाय
दरम्यान मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या दोन हप्त्यांच्या रकमेतून स्वतःचा व्यवसाय सुरू करून एक आठवड्यात 12 हजार रुपयांचा नफा मिळवणार्या परळी येथील नेहरु चौकातील अक्षरा अक्षय शिंदे या महिलेचा अजित पवार व मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला आहे. आर्टिफिशियल वटवृक्ष तयार करण्याचा व्यवसाय अक्षरा शिंदे यांनी सुरू केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भाषणातून त्यांचे कौतुक केले.