भुसावळातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर 57 फटाक्यांच्या दुकानांना परवानगी

शुक्रवारपासून दुकाने होणार खुली : 3 नोव्हेंबरपर्यंत मुदत


भुसावळ (25 ऑक्टोबर 2024)  : शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदान अर्थात डी.एस. हायस्कूल मैदानावर यंदा दिवाळीच्या फटाक्यांची दुकाने थाटली जाणार आहेत. या मैदानाचा व्यावसायीक वापर करू नये, असा ठराव असलातरी मात्र दिवाळीत शहरात फटाके विक्रीच्या दुकानांसाठी सोयीची जागा नसल्याने यंदाही पालिकेने फटाके विक्रेत्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानाची जागा उपलब्ध करुन दिली आहे. या मैदानावर दर्शनी भागात यंदा 57 फटाक्यांची दुकाने थाटली जाणार आहे. प्रशासनाने या दुकानांसाठी जागेचे मोजमाप करुन विक्रेत्यांना जागेची आखणी करून दिली.

57 दुकानांना परवानगी
पालिकेने शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानाची पालिकेने डागडूजी केली आहे. यानंतर या मैदानाचा व्यवसायीक वापर होणार नाही, असे पालिकेने जाहिर केले होते. याबाबतचा ठरावदेखील झाला होता. यापूर्वी देखील असे ठराव घेण्यात आले होते मात्र यंदाही शहरात पर्यायी जागा नसल्याने मैदानावरच फटाक्यांची दुकाने थाटली जात आहेत. यासाठी विक्रेत्यांनी तात्पुरत्या स्वरुपात परवानगी देण्यात आली आहे. यंदा दिवाळीत 57 दुकाने थाटली जाणार आहेत. पालिकेने दुसरी मोक्याची जागा नसल्याचे सांगत याच मैदानावर विक्रीसाठी परवानगी दिली आहे. आता विक्रेत्यांनी जागेच्या आखणीनुसार तात्पुरत्या स्वरुपात दुकाने उभारण्याची तयारी सुरू केली असून शुक्रवारपासून दुकानांमधून फटाके विक्री सुरू होईल.

दिवाळीनंतर व्हावी व्यापक स्वच्छता
पालिकेने डॉ.आंबेडकर मैदानावर फटाके विक्रीसाठी तात्पुरत्या स्वरुपात जागा उपलब्ध करून दिली मात्र दिवाळीनंतर ही दुकाने बंद झाल्यानंतर या मैदानावर दुकाने उभारणीसाठी झालेले खोदकाम योग्य पध्दतीने बुजविणे, मैदानावर व्यापक स्वच्छता करणे आदी उपाययोजना करणे अपेक्षीत आहे. अन्यथा पालिकेला या जागेतून मिळालेल्या भाड्याऐवजी मैदान डागडूजीसाठी अधिक खर्च करावा लागेल.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !