मतदारसंघाच्या सदैव विकासासाठी अग्रेसर राहणार : अमोल जावळे

फैजपूरात भाजपाचा मेळावा : शक्ती प्रदर्शन रॅलीत सहभागाचे आवाहन


फैजपूर (28 ऑक्टोबर 2024) : आमदार नव्हे कामदार असल्याचे भान ठेवूनच जनतेच्या व मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव अग्रेसर राहण्याचा यशस्वी प्रयत्न करू, असे अभिवचन महायुतीचे उमेदवार अमोल हरिभाऊ जावळे यांनी येथे दिले. फैजपूर शहरातील शुभ दिव्य मंगल कार्यालयात रविवार, 27 ऑक्टोबर रोजी महायुतीचा मेळावा झाला. याप्रसंगी ते बोलत होते. अमोल जावळे म्हणाले की, सोमवार, 28 रोजी आपल्या सर्वांच्या साक्षीने महायुतीचा उमेदवारी अर्ज रावेरात सादर करणार आहे. हजारोंच्या संख्येने उपस्थिती देवून आशीर्वाद द्यावे, आवाहन अमोल जावळे यांनी केले.

यांची होती उपस्थिती
रावेर विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीचा पहिला मेळावा रविवारी शुभदिव्य मंगल कार्यलयात कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या उपस्थितीत झाला. या कार्यक्रमास रावेर विधानसभा निवडणूक विस्तार अधिकारी तथा भाजपा किसान मोर्चा राष्ट्रीय उपाध्यक्ष खासदार बन्सीलाल गुजर, डॉ.राध्येश्याम चौधरी आदींची उपस्थिती होती. व्यासपीठावरा महायुतीचे उमेदवार उमेदवार अमोल जावळे, मंत्री गिरीश महाजन यांचे प्रतिनिधी अरविंद देशमुख, किसान मोर्चा उत्तर महाराष्ट्र संयोजक सुरेश धनके, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शरद महाजन, हिरालाल चौधरी, जिल्हा सहकार आघाडी अध्यक्ष नरेंद्र नारखेडे, माजी नगराध्यक्ष पांडुरंग सराफ, पी.के.चौधरी, आशालता चौधरी, महानंदा होले, मिलिंद वाघूळदे, हेमराज चौधरी, तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, विधानसभा क्षेत्रप्रमुख विलास चौधरी, तालुका सरचिटणीस उज्जैनसिंग राजपूत, शिवसेना शिंदे गट जिल्हा उपाध्यक्ष तुषारसिंग पाटील, भाजपा महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष भारती पाटील, तालुकाप्रमुख राजू काठोके, शहरप्रमुख पिंटू मंडवाले, महिला सेना तालुका यावल प्रमुख पूनम पाटील, तालुका ावेर महिला प्रमुख स्वाती भंगाळे, भाजपा तालुका महिला प्रमुख जयश्री चौधरी आदींची उपस्थिती होती.

मतदारसंघ विकासासाठी भाजपाला संधी द्या
रावेर विधानसभा पक्ष विस्तारक खासदार बन्सीलाल गुजर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारने विश्वभरात भारताला आर्थिक व विविध स्तरावर अग्रेसर करीत देशाचा व महाराष्ट्रचा सर्वांगीण विकास केला आहे. देशातील नागरिकांसाठी पी.एम.किसान योजना, पी.एम.पीक विमा, लाडकी बहिण, उज्वला गॅस, महिला बस सवलत योजना राबवून नागरिकांचा विकास साधला आहे. मतदारसंघाच्या विकासासाठी भाजपा उमेदवार अमोल जावळे यांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले. प्रास्ताविक विलास चौधरी तर सूत्रसंचालन राकेश फेगडे यांनी केले. अरविंद देशमुख, नरेंद्र नारखेडे, पांडुरंग सराफ, आशालता चौधरी, पिंटू मंडवाले आदींनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाइ, महायुतीचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !