बीएलओंनी 100 टक्के व्होटर स्लीप वाटप करावे : भुसावळात प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांच्या सूचना


भुसावळ (28 ऑक्टोबर 2024) : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीएलओ यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील मतदारांना 100 टक्के व्होटर स्लीप वाटप कराव्यात, वयोवृध्द मतदारांना होम व्होटींगची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 12 ड फॉर्म भरावा, अश्या सूचना निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांनी बीएलओ यांना दिल्यात. प्रांताधिकारी कार्यालयात शुक्रवारी दुपारी चार वाजता बीएलओंच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पाटील, गटविकास अधिकारी डॉ.सचिन पानझडे, निवडणूक नायब तहसीलदार अंगद आसटकर यांनी उपस्थित बीएलओ यांना सूचना केल्यात.

स्लीप वाटपाचे शंभर टक्के उद्दिष्ट
आसटकर म्हणाले की, व्होटर स्लिप बाबत शंभर टक्के वाटप करण्याचे उद्दिष्ट आहे तसेच शंभर वय असलेल्या मतदारांना घर बसल्या मतदानाची सुविधा उपलब्ध करून देणे 12 ड फॉर्म, पोल डे आदींबाबत त्यांनी माहिती दिली. बुथ लेवल असिस्टंट यांची व्होटर स्लीप वाटपासाठी मदत घेणे, बीएलओ यांनी मतदारांना नाव, नंबर, बूथ शोधण्यासाठी मदत करणे, व्होटर स्लीप वाटताना पोच घेणे, 85 वयापेक्षा जास्त वयाचे मतदार, दिव्यांग, आक्षेप पंचनामा पेपर या सर्व बाबींची माहिती देण्यात आली तसेच पोस्टल बॅलेट टीमच्या बैठकीत नायब तहसीलदार प्रीती लूटे यांनी फॉर्म 12 आणि 12 अ बद्दल माहिती दिली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !