एरंडोल-पारोळा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख हर्षल माने यांनी शक्ती प्रदर्शन करीत भरला उमेदवारी अर्ज

मातोश्रीच्या आशीर्वादानंतर हर्षल माने विधानसभा आखाड्याच्या रिंगणात : मतदारांचा कौल आपल्या बाजूने : उमेदवार हर्षल माने यांचा विश्वास


एरंडोल (30 ऑक्टोबर 2024) : पारोळा-एरंडोल मतदारसंघातून मंगळवारी धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर एरंडोल-पारोळा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख हर्षल माने यांनी आपला उमेदवारी अर्ज प्रचंड शक्ती प्रदर्शन करीत भरला. यावेळी माध्यमांशी बोलताना हर्षल माने म्हणाले की, यंदा निवडणुकीत बदल घडणार असून निश्चितपणे कौल आपल्यालाच मिळणार आहे.

एरंडोलमध्ये धगधगली मशाल
हर्षल माने यांनी निवडणूक अर्ज दाखल करण्यापूर्वी शहरातील विविध भागातून जोरदार शक्ती प्रदर्शन केले. यावेळी कार्यकर्त्यांच्या हातात ठाकरे गटाची मशाल तसेच शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांचे कट आऊट लक्ष वेधून घेत होते. मनामनात हर्षल माने, हिंदूतत्वादी सरकार आदी विषयाच्या बॅनरही नागरिकांचे लक्ष वेधले.

सुवासिनींनी केले औक्षण
हर्षल माने यांच्या शक्ती प्रदर्शन रॅली दरम्यान शहरातील विविध भागात सुवासिंनीनी हर्षल माने यांचे औक्षण करीत त्यांना आशीर्वाद दिले.

यांची होती उपस्थिती
उपजिल्हाप्रमुख दशरथ महाजन, विधानसभा क्षेत्रप्रमुख जगदीश दादा, तालुकाप्रमुख रवींद्र चौधरी, पारोळा तालुकाप्रमुख आर.बी.पाटील सर, विजय अण्णा महाजन, रमेश अण्णा महाजन, किशोरभाऊ निंबाळकर, रोकडे सर, राजू भाऊ चौधरी, आनंदा चौधरी, प्रमोद महाजन, अनिल महाजन, प्रवीण पवार, अतुल महाजन, जयेश महाजन, सुनील चौधरी, अशोक मराठे, समाधान चौधरी, आबा बडगुजर, मधुकर गिरड, रेवानंद ठाकूर, संजू आबा, सुनंदा पाटील, दीपाली हर्षल माने, पांडुरंग आबा बाविस्कर, समाधान पाटील, अशोक मोपारी, रूपेश माळी, रवी आबा पवार, सुनील पहेलवान, जलाल, निलेश अग्रवाल, रवी बापू आदींची उपस्थिती होती.

उमेदवारीसाठी मातोश्रीचा आशीर्वाद : हर्षल माने
हर्षल माने म्हणाले की, मातोश्रीच्या आशीर्वादाने आपण ठाकरे गट पुरस्कृत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यंदा विधानसभा निवडणुकीत परिवर्तन निश्चित असून कौल आपल्यालाच मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !