रावेर विधानसभेच्या आखाड्यात छाननीत चार अर्ज अवैध
रावेर (30 ऑक्टोबर 2024) : रावेर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निवडणुकीसाठी 38 उमेदवारी अर्ज झाले मात्र बुधवारी झालेल्या छावणीत दोन उमेदवाराचे चार अर्ज अवैध ठरले. दरम्यान, माघारीअंती रावेरचे चित्र स्पष्ट होणार असलेतरी प्रमुख मातब्बरांसह 23 उमेदवारांचे 34 अर्ज असल्याचे सूत्रांनी सांगितले.
38 अर्ज दाखल
रावेर विधानसभा मतदारसंघासाठी संघाच्या निवडणुकीसाठी एकूण 25 उमेदवारांनी 38 दाखल केले होते. रावेर मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी बबनराव काकडे यांच्या उपस्थितीत उमेदवारी छाननी अर्जाची छाननी झाली. त्यात शिरीष चौधरी (1), जयश्री जावळे (3) यांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरले. आता 23 उमेदवारांचे 34 उमेदवार अर्ज वैध असून माघारीनंतर चित्र स्पष्ट होणार आहे.