रावेर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अमोल जावळे यांच्या प्रचाराचा शुभारंभ

मंत्री रक्षा खडसे यांची उपस्थिती : नागरिकांकडून फुलांच्या वर्षावात अमोल जावळे यांचे स्वागत


Amol Javale launches the campaign of Mahayuti candidate in Raver constituency फैजपूर (4 नोव्हेंबर 2024) : रावेर विधानसभा निवडणुकीतील भाजपा महायुतीचे तरुण उमेदवार अमोल हरिभाऊ जावळे यांच्या प्रचाराचा शुभारंभ सोमवार, 4 नोव्हेंबर रोजी प्रति जेजुरी श्री खंडोबा मंदिरात श्रीफळ वाढवून करण्यात आला. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, अमोल हरिभाऊ जावळे, जयश्री अमोल जावळे यांची प्रमुख उपस्थिती होती. शहरातून यावेळी उमेदवाराची भव्य प्रचार रॅली काढण्यात आली. शहरात जागोजागी उंच इमारतीमधून नागरिकांनी फुलांचा वर्षाव केला तसेच ठिकठिकाणी मंत्री रक्षा खडसेंसह भाजपाचे उमेदवार अमोल जावळे यांचे औक्षण करण्यात आले.

खंडोबा महाराजांचे घेतले आशीर्वाद
होमहवन, महापूजा, आरती मंत्री रक्षा खडसे, अमोल जावळे, जयश्री जावळे यांच्याहस्ते करण्यात आले. खंडोबा चरणी नारळ वाढविण्यात आला. याप्रसंगी मंदिराचे उत्तराधिकारी पवनदासजी पूजारी राममनोहर दासजी यांनी आशीर्वाद दिले. पूजेचे पुरोहित्य उदय जोशी, मोहन जोशी, कुंदन जोशी, दुर्गेश जोशी, दिनकर जोशी, धीरज मोतीवाले यांनी केले.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी बेटी बचाव बेटी पढावचे राष्ट्रीय संयोजक डॉ.राजेंद्र फडके, माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, डॉ.कुंदन फेगडे, भरत महाजन, पांडुरंग सराफ, भाजपा किसना मोर्चा उत्तर महाराष्ट्र प्रमुख सुरेश धनके, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शरद महाजन, हिरालाल चौधरी, पद्माकर महाजन, प्रल्हाद पाटील, जिल्हा चिटणीस हरलाल कोळी, रावेर लोकसभा क्षेत्र प्रमुख नंदकिशोर महाजन, रावेर विधानसभा क्षेत्र प्रमुख विलास चौधरी, जि.प.चे माजी सभापती अहमद तडवी, पंचायत समितीचे माजी सभापती पल्लवी चौधरी, सरपंच परिषद जिल्हाध्यक्ष पुरोजीत चौधरी, जिल्हा दुध फेडरेशन संचालक नितीन चौधरी, माजी सदस्य हेमराज चौधरी, पल्लवी पाटील, हेमलता इंगळे, मीना तडवी, रावेर तालुकाध्यक्ष महेश चौधरी, यावलचे उमेश फेगडे, फैजपूरचे माजी नगराध्यक्ष बी.के.चौधरी, आशालता चौधरी, महानंदा होले, नितीन राणे, शिवसेनेचे प्रवीण पाटील, यावल तालुका प्रमुख राजू काठोके, शहराध्यक्ष पिंटू तेली, शिवसेना शहर प्रमुख पिंटू मंडवाले, भाजपा महिला जिल्हा उपाध्यक्ष भारती पाटील, महिला यावल प्रमुख पाटील, रावेर तालुकाप्रमुख बोंडे, भाजपा महिला तालुकाध्यक्ष जयश्री चौधरी, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सागर कोळीसह भाजपा शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, रिपाई आठवले गट सह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !